रणवीर सिंगचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल; फोटो बघून व्हाल Shocked

रणवीर सिंगचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल; फोटो बघून व्हाल Shocked

अभिनेता रणवीर सिंग

बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या कोणत्याही कारणाने चर्चेत येत असतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे रणवीर. रणवीरचा जुना फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कलाकार मंडळी नेहमीच आपल्या चाहत्यांकरिता त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. रणवीरच्या या जुन्या फोटोमुळे रणवीर चाहत्यांच्या चर्चेत आला आहे. नुकताच सोशल मीडिय़ावर व्हायरल होणारा रणवीरचा फोटो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या फोटोमध्ये रणवीर त्याच्या मैत्रिणीसोबत कूल लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये रणवीर लांब केसात दिसत असून या फोटोमध्ये त्याच्या सोबत असणारी मैत्रिण पिया त्रिवेदी दिसतेय. या फोटोमुळे रणवीरच्या चाहत्यांमध्ये त्याच्याच नावाचा बोलबाला असल्याने पुन्हा सगळ्याचे लक्ष रणवीरने वेधून घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर त्याच्या आगामी चित्रपट ’83’ च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. नुकताच रणवीरने वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटामध्ये दिपीका देखील दिसणार असून कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका साकारणार आहे.

First Published on: July 12, 2019 9:31 AM
Exit mobile version