न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहने मांडली बाजू; अडीच तास चालू होती चौकशी

न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहने मांडली बाजू; अडीच तास चालू होती चौकशी

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील अनेक दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला. रणवीर सिंहच्या या फोटोशूटमुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. रणवीर ट्रोल झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याची पाठराखण केली. दरम्यान, त्यानंतर रणवीरवर मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर होणारा विरोध पाहून मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहला नोटीस पाठवली असून 22 ऑगस्ट रोजी रणवीर सिंहला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. दरम्यान, रणवीरने मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवून पोलिसांकडे दोन आठवड्याची मुदत वाढ मागितली होती. त्यानंतर चेंबुर पोलिसांनी रणवीर सिंहला 29 ऑगस्ट रोजी म्हणजेच बोलावण्यात आलं होतं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सात वाजता दाखल झाला आणि त्याची बाजू मांडली. जवळपास अडीच तास पोलिस आणि रणवीरमध्ये चौकशी चालू होती. सकाळी साडे नऊच्या सुमारास रणवीर पोलिस स्टेशनमधून बाहेर पडला. पोलिसांनी सांगितले की, गरज पडल्यास रणवीरला पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात येईल.

चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले होते. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम 292, 293, 345 आणि 509, 67 A हे कलम लावले होते.


हेही वाचा : न्यूड फोटोशूटप्रकरणी आलेल्या नोटिशीवर रणवीर सिंह गैरहजर; दोन आठवड्यांची मागितली मुदतवाढ

First Published on: August 29, 2022 5:42 PM
Exit mobile version