रणवीरनं दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

रणवीरनं दिला महिला सशक्तीकरणाचा संदेश

रणवीर सिंह

रणवीर सध्या आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो आणि व्हिडिओ रणवीर सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. त्यामुळं नक्की हा चित्रपट कसा असेल? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांनाही आहे. रविवारी रणवीरनं अजून एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रणवीर एका कारवर बसलेला दिसत आहे. तर त्याच्या आजूबाजूला खूपच महिला आहेत. या महिला बाईक चालवताना या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. तर काही महिला या रणवीरबरोबरच कारवर बसल्या आहेत. शिवाय या महिलांच्या हातात भगवे झेडे आहेत.

वुमन पॉवर..रोहित शेट्टी स्टाईलमध्ये

दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करत आपल्या नेहमीच्या अंदाजामध्ये रणवीरनं ‘या डिसेंबरमध्ये…नारी शक्ती…रोहित शेट्टीच्या स्टाईलमध्ये’ असं कॅप्शन देत पुन्हा एकदा धमाका उडवून दिला आहे. रोहित शेट्टी नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये काही ना काही वेगळं करत असतो. यावेळी रणवीर सिंग अभिनीत ‘सिम्बा’मध्ये काय वेगळेपणा असणार आहे हे लवकरच दिसेल. तर या गाण्यातून ही नारी शक्ती नक्की काय संदेश देणार आहे? याचीदेखील उत्सुकता सध्या प्रेक्षकांना आहे.

रोहित आणि रणवीरची मॅडपंती

रोहित आणि रणवीरची मॅडपंती एकाच चित्रपटात दिसणार असून प्रेक्षकही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. रोहित आणि रणवीर हे दोघेही आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही पहिल्यांदाच ‘सिम्बा’च्या निमित्तानं एकत्र काम करत असून त्यांची ही मॅडपंती चित्रपटातदेखील बघायला मिळणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

First Published on: August 26, 2018 8:22 PM
Exit mobile version