लोकांकडे नीट खायला जेवण नाही पण दुसऱ्यांच्या कपड्यांवर… ‘पठाण’ वादावर रत्ना पाठक यांची प्रतिक्रिया

लोकांकडे नीट खायला जेवण नाही पण दुसऱ्यांच्या कपड्यांवर… ‘पठाण’ वादावर रत्ना पाठक यांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकार दीपिका आणि शाहरुखची पाठराखण करु लागले आहेत. अशातचं आता अभिनेत्री रत्ना पाठक यांनी देखील या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘पठाण’ वादावर रत्ना पाठक यांची प्रतिक्रिया
रत्ना पाठक सध्या एका गुजराती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जो 6 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याचं दरम्यान, एका मुलाखतीत रत्ना पाठक यांना पठाण चित्रपटावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मला वाटतं की, जर ही गोष्ट तुमच्या डोक्यात आधी येते मग तर आपण खूप मूर्ख आहोत. ही अशी गोष्ट नाही. ज्यावर मी जास्त बोलू शकेन, मला आशा आहे की भारतामध्ये यावेळी दिसत आहेत त्यापेक्षा अधिक समजूतदार लोक आहेत. ते नक्कीच समोर येतील. कारण हे जे चालू आहे. भीतीचे वातावरण, बहिष्कार करण्याती भीती, नेहमी नाही राहणार”

रत्ना पाठक पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक व्यक्ती एका वेळेनंतर तिरस्कार सहन करु शकत नाही. हा आधी वाढतो परंतु नंतर लोक स्वतःहून थकतात. मी त्या दिवसाची वाट पाहतेय. आपल्या देशाकडे पाहा. महामारीने लहान व्यवसायकांना संपवून टाकलंय. लोकांकडे नीट खायला जेवण नाही आणि आपण लोग काय घालत आहेत या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवत आहोत.”

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

अनुष्काचा ‘त्या’ ब्रॅण्डबद्दलचा वाद नेमका कशासाठी? नेटकरी म्हणाले ही तर स्ट्रॅटजी

First Published on: December 20, 2022 10:47 AM
Exit mobile version