घरमनोरंजनअनुष्काचा 'त्या' ब्रॅण्डबद्दलचा वाद नेमका कशासाठी? नेटकरी म्हणाले ही तर स्ट्रॅटजी

अनुष्काचा ‘त्या’ ब्रॅण्डबद्दलचा वाद नेमका कशासाठी? नेटकरी म्हणाले ही तर स्ट्रॅटजी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या चकदा एक्सप्रेस या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेकदा अनुष्का चुकीच्या गोष्टींवर आपलं मत देखील व्यक्त करत असते. दरम्यान, अशातच अनुष्का आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे एका कपड्यांच्या ब्रँडने अनुष्काचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत जाहिरात केली आहे.

अनुष्का शर्माने घेतली PUMA ची शाळा

 

View this post on Instagram

 

A post shared by PUMA India (@pumaindia)

- Advertisement -

अनुष्का शर्मा अलीकडे अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टींवर आपलं मत देखील व्यक्त करत असते. मागील काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या रुमचा व्हिडीओ काढलेल्या चाहत्याला खडेबोल सुनावले होते. दरम्यान, आता यावेळी PUMA या कपड्यांच्या नामांकित ब्रँडने तिच्या फोटोंचा चुकीचा वापर केल्यामुळे अनुष्का त्यांच्यावर संतापली आहे. अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर करत तिचे फोटो काढून टाकण्याची ताकीद दिली आहे.

मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही माझे फोटो काढा..

- Advertisement -

अनुष्काची कोणतीही परवाणगी न घेता तिचे फोटो शेअर केल्यामुळे तिने PUMA ब्रँडवर संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने लिहिलंय की, “हॅलो @PUMAINDIA? मला वाटतंय तुम्हाला ठाऊक असेल की, जाहिरातीसाठी माझे फोटो घेण्यापूर्वी तुम्हाला माझी परवागणी घ्यायला हवी. कारण मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही….कृपया माझे फोटो काढा…” दरम्यान, अनुष्काने सक्त ताकीद देऊनही PUMAINDIA ने अनुष्काचे फोटो डिलीट केले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by PUMA India (@pumaindia)

मिळालेल्या माहितीनुसार, आता PUMAINDIA कडून देखील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात कराराचे कागद दिसत आहेत. त्यावर लाल रंगाने कॉन्फिडेंशियल असं लिहिलं आहे. सोबतच खाली कॅप्शनमध्ये “हॅलो अनुष्का शर्मा, आपल्याला लवकरच संपर्क करायला हवा! की या गोष्टी आपण पुढच्या टप्प्यावर घेऊन जायला हव्या?”ही पोस्ट पुन्हा अनुष्काने शेअर करत आता तर मी यावर झोपून जाईन असं लिहिलं आहे.

दरम्यान, आता अनुष्का आणि PUMAINDIA च्या या पोस्ट प्रमोशनसाठी असल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा :

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -