रेडीमिक्सची तारीख फिक्स

रेडीमिक्सची तारीख फिक्स

चित्रपटाची कथा पुढे सरकवण्यासाठी बर्‍याच वेळा सेलिब्रिटी व्यक्तीचा आवाज वापरला जातो. हिंदीत अमिताभ बच्चन तर मराठीत हा मान कोणाला जास्त मिळाला असेल तर तो सचिन खेडेकरला. नाटक, चित्रपटामध्ये हा आपुलकीचा, भारदस्त, स्पष्ट आवाज सर्रासपणे ऐकायला मिळतो.

‘ठाकरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरसाठीही सचिनचा आवाज वापरलेला आहे. ‘रेडीमिक्स’ च्या टीझरला सचिनचा आवाज देण्यात आलेला आहे. ८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘रेडीमिक्स’ची तारीख अखेर फिक्स झाली.

अमेय खोपकर यांच्या चित्रसंस्थेच्यावतीने ‘रेडीमिक्स’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. शेखर ढवळीकर लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन जालिंदर कुंभार याने केलेले आहे. अल्प कालावधीमध्ये वैभव तत्त्ववादी व प्रार्थना बेहेरे या जोडीने एकत्रपणे ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘वॉट्सअप लग्न’ या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

‘रेडीमिक्स’ च्या निमित्ताने पुन्हा हे दोघे एकत्र येणार आहेत. स्नेहा जोशी ही अभिनेत्रीसुद्धा यात कलाकार म्हणून दिसणार आहे. ‘रेडीमिक्स’मध्ये समीर या युवा इंटिरिअर डेकोरेटरच्या आयुष्याची कथा पहायला मिळणार आहे. या तिघांसोबत सुनिल तावडे, आनंद इंगळे, गिरिष परदेसी, आशा पाटील यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. अविनाश विश्वजित यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे.

First Published on: January 12, 2019 12:03 AM
Exit mobile version