लाल ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; कियारा अडवाणीचा लूक चर्चेत

लाल ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र अन् हातात चुडा; कियारा अडवाणीचा लूक चर्चेत

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता त्यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराने दिल्लीत पोहोचल्यावर पत्रकरांना मिठाई वाटली.

तर कियाराने लाल रंगाचा ओढणी ड्रेस परिधान केला होता. शिवाय कियाराने गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा आणि सिंदूर देखील लावलं होत. कियाराचा हा नववधू लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाही थाटात पार पडलं लग्न

सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडलं. काल दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात काढण्यात आली यावेळी विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंट देखील होते.

 


हेही वाचा :

भारतात ‘पठाण’ हाऊसफुल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

First Published on: February 9, 2023 11:42 AM
Exit mobile version