200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 2 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक आणि तेवढ्याच रकमेचा जामीन देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. 10 नोव्हेंबर रोजी कोर्टात जॅकलिनच्या जामिनावर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (jacqueline fernandez) सशर्त जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणात अभिनेत्री अंतरिम जामिनावर सुटली होती.

सुकेश चंद्रशेखरसोबत २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव जोडले गेल्याने जॅकलिन अडचणीत आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या आरोपपत्रात अभिनेत्रीला आरोपी ठरविले होते. त्याचबरोबर अभिनेत्रीला सुकेशकडून मिळालेल्या महागड्या गिफ्टबद्दलही अनेकवेळा चौकशी करण्यात आली. तेव्हापासून अभिनेत्री अंतरिम जामिनावर होती. पण 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत जॅकलिन पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा परदेशात जाऊ शकते, असे सांगत ईडीने याला विरोध केला होता.

जॅकलिनच्या जामीनाला ईडीने विरोध करत, त्यांना ७.१४ कोटी रुपयांचा गंडा घातला होता आणि परदेशात पळून जाण्यासाठी पुरेसा पैसा होता. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये. त्याचवेळी जॅकलिनने ईडीवर छळ केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाच्या परवानगीने ती परदेशात जाऊ शकते, न्यायालयाने जॅकलिनला परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर आता जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे.

सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिनला ५.७१ कोटी रुपयांची भेटवस्तू दिल्याचे ईडीने सांगितले होते. जॅकलिनच्या वतीने स्क्रिप्ट लिहिण्यासाठी जॅकलिनच्या कुटुंबाला १.३ कोटी रुपये आणि वेब सीरिजच्या लेखकाला १५ लाख रुपये देण्यात आले होते. त्याच वेळी, जॅकलिनने ईडीला सांगितले होते की सुकेशने तिला वीन एल्कलाइन पाण्याच्या बाटल्या, एक लिमिटेड एडिशनचा परफ्यूम, प्रत्येकी नऊ लाख किमतीच्या तीन मांजरी आणि 52 लाख किमतीचा एक अरबी घोडा दर आठवड्याला भेट म्हणून दिला होता. याशिवाय सुकेशने जॅकलिनला इतर अनेक महागड्या गोष्टी भेट म्हणून दिल्या होत्या.


हे ही वाचा – करिअरच्या सुरुवातीलाच निर्मात्यांनी माझ्या अंगावर कुत्रे सोडले; रणवीर सिंगने सांगितला कटू अनुभव

First Published on: November 15, 2022 9:05 PM
Exit mobile version