नव्या वर्षात रिया चक्रवर्ती करणार बॉलिवूडमध्ये ComeBack!

नव्या वर्षात रिया चक्रवर्ती करणार बॉलिवूडमध्ये ComeBack!

रिया चक्रवर्ती

२०२० हे वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वांनाच चिंतेचं गेलं. यामध्ये सामान्य नागरिकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश होता. यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीने काही बडे कलाकार गमावले. यामध्ये सुशांतसिंह राजपूतचा देखील समावेश होता. सुशांतच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह चाहत्याना मोठा धक्का बसला. सुशांत त्यावेळी रिया चक्रवर्तीसह कमिटेड रिलेशनमध्ये होता. सुशांतच्या अचानक आत्महत्येनंतर रियाला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली. दरम्यान, आता सुशांत आणि रियाचा कॉमन फ्रेंड रूमी जाफरीने रिया लवकरच नव्या वर्षात चित्रपटात कमबॅक करणार असून दिग्दर्शक रुमी जाफरीच्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रुमी जाफरी पुढे म्हणाले की, “पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. ती ज्या परिस्थीतीतून गेलीय त्यानंतर तिच्यावर आपण आरोप करु शकत नाही.” रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका झाली होती. तेव्हा रुमी जाफरीने तिची भेट घेतली होती आणि तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा परतायला सांगितलं होतं.

सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने साधारण १ महिना जेलमध्ये घालवल्यानंतर तिला जामीन मिळाला. सध्या रिया काय करते याची माहिती कोणालाच नसताना लेखक-दिग्दर्शक रूमी जाफरी यांनी रियाची भेट घेतली. यावेळी रिया नव्या वर्षात चित्रपटात कमबॅक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूमी जाफरी यांनी स्पॉटबॉयला सांगितले की, 2020 हे वर्ष सर्वांसाठीच वाईट होतं. पण रियासाठी हा वेगळ्या प्रकारचा मानसिक तणाव होता. दरम्यान, रुमी यांनी सांगितले की, मी रियाला भेटलो आणि तिला सांगितले की इंडस्ट्री तिचे मनापासून स्वागत करेल.


Video: राखीनं पातळीचं ओलांडली! राहुल महाजनचं केलं वस्त्रहरण

First Published on: December 31, 2020 3:11 PM
Exit mobile version