रिचा चड्ढाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

रिचा चड्ढाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

रिचा चड्ढा

अभिनेत्री रिचा चड्ढा लकरवच तिचा नवा चित्रपट शकीला मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिने एका दक्षिण भारतीय अडल्टस्टारची  भूमिका केली आहे. शकीलाच्या आयुष्यावर आधारित अभिनेत्री रिचा चड्ढा महत्वाची भूमिका करते आहे. अभिनेत्री सिल्क स्मितानंतर आता अडल्टस्टार शकीलाच्या जीवणावर आधारित चित्रपट लकरवच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिचाना आगामी चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. धाडसी आणि सुंदर असे लिहिले आहे. या पोस्टरमध्ये रिचा दागिण्यांमध्ये उभी आहे. तिच्या पाठीमागे शकीलावर झालेल्या टीका लिहिल्या आहेत. या चित्रपटात रिचा एका मल्याळम अभिनेता राजीव पिल्लई याच्याबरोबर रोमांस करताना दिसणार आहे. हा चित्रपट ४५ वर्षीय शकीलाच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे नाव ‘शकीला-नॉट अ पॉर्न स्टार’ असे ठेवण्यात आले आहे.

कोण आहे शकीला

शकीला एक दक्षिण भारतीय अडल्ट स्टार आहे. एका वेळी शकीला सर्वाधिक मानधन मिळवणारी कलाकार होती. आपल्या अभिनया व्यतिरिक्त शकिलाला अनेक भाषा येत होत्या. शकिलाने तमीळ, तेलगू, कन्नड आणि माल्याळम चित्रपटात काम केले. चित्रपटात बोल्ड सिन्समुळे अनेकाने शकीलावर टीका केली होती. मात्र कोणालाही न जुमानता शकीलाने चित्रपटांमध्ये काम केले. यामुळे तिला अनेक चित्रपटात काम केले. शकीलाने १९८० मध्ये चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किन्नरा तुंबिकल’ या चित्रपटातून ती चर्चेत आला. एक अडल्ट स्टार म्हणजे काय त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी यावर आधारित हा चित्रपट लवरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on: November 20, 2018 3:10 PM
Exit mobile version