अखेर आपल्या प्रिय मित्राबद्दल बोलले अमिताभ बच्चन!

अखेर आपल्या प्रिय मित्राबद्दल बोलले अमिताभ बच्चन!

बॉलिवूडमधील  जेष्ठे अभिनेते ऋषी कपूर गुरूवारी अनंतात विलीन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका इन्स्टाग्राम ब्लॉगच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण अमिताभ बच्चन ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी कधीच रूग्णालयात गेले नाही याचा खुलासा नुकताच त्यांनी ब्लॉग मधून केला आहे. बिग बी यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली होती. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट केले. आता बिग बी यांनी ब्लॉग लिहून ऋषी कपूर यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला आहे. ऋषी कपूर यांच्या पहिल्या भेटीपासून शेवटच्या भेटीपर्यंतचा उल्लेख या ब्लॉगमध्ये केला आहे.

काय लिहीलं आहे ब्लॉगमध्ये

“ऋषी कपूर यांना त्यांच्या देवनारच्या घरी मी पहिल्यांदा पाहिलं होतं. मला राज कपूर यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं, त्यावेळी त्यांना भेटलो होतो. ते अत्यंत उर्जावान होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, हालचालीत  नेहमी उत्साह असायचा. त्यावेळी ते ‘बॉबी’ चित्रपटाची तयारी करत होते. त्यानंतर अनेकवेळा आर के स्टूडिओत त्यांच्या भेटीचा योग आला. चित्रपटांदरम्यान त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यामुळे भोवतालचं वातावरण सकारात्मक राहायचं. ते नेहमीच आम्हाला हसवायचे. बॉबीच्या निमित्ताने आमचा सहवास वाढत गेला. ते नेहमी काहीना काही शिकण्याच्या तयारीत असायचे. त्यांचे बोलणं, चालणं बघून त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर आठवायचे. एखाद्या गाण्यावर उत्तम लिप्सिंग, चालण्याचा अंदाज पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर ऋषी कपूर यांच्यात बघितला आहे. आम्ही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. ते कायम सेटवर मजा मस्ती करायचे. शूटींच्यामध्ये वेळ मिळाला की ते कार्ड किंवा एखादा गेम खेळायचे.

या हसत्या खेळत्या चेहऱ्याला रुग्णालयात जाऊन पाहण्याची हिंमत कधी झालीच नाही. किंबहूना उपचार घेत असताना त्यांना होणारा त्रास मी पाहू शकलो नसतो. मी ऋषी कपूर यांना आजवर कधीच निराश अवस्थेत पाहिलं नव्हतं. ते एक प्रेरणादायी व्यक्तमत्व होतं. मला खात्री आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सभोवतालचं वातावरण उत्साही ठेवलं असणार.

अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी लिहिली आहे.


हे ही वाचा – ‘एक गाडी में सवार दोनों सितारे,एक साथ सफर पर निकल पडे’


 

First Published on: May 1, 2020 1:53 PM
Exit mobile version