‘माऊली’ चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ गाणं रिलीज!

‘माऊली’ चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ गाणं रिलीज!

सयामी खेर आणि रितेश देशमुख (सौजन्य-ट्विटर)

टाळ, मृदुंग, ढोल, दिपज्योत आणि विठ्ठलनामाचा गजर याच्या जयघोषात ‘माऊली’ चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे गाणं आज, कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले आहे. अभिनेता रितेश देशमुख याचा आगामी चित्रपट ‘माऊली’मधील हे पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं असून, स्वरबद्धही केलं आहे. शिवाय गाण्याच्या चित्रीकरणातही त्यांचा सहभाग पाहायला मिळतो. ‘माझी पंढरीची माय…’ गाण्यामध्ये रितेश देशमुखसह प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सयामी खेरदेखील सहभागी आहे. साधारण ७.१६ मिनिटांच्या या गाण्यात विठ्ठलांचे गुणगाण गाणारे बोल आणि ‘माऊली… माऊली…’ सातत्याने होणारा निनाद श्रवणीय आहे. मात्र रितेश देशमुखची ‘लय भारी’ स्टाईलची झलकही ‘माऊली’मध्ये पाहायला मिळते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरात भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली असताना त्यातच ‘माझी पंढरीची माय’  हे गाणं रिलीज झाल्यामुळे सर्वच वातावरण भक्तीमय झालं आहे.

वाचा : Video: रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा टिझर

अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

वाचा : लयभारी म्हणत रितेशच्या ‘माऊली’चं पोस्टर रिलीज

वाचा : डिसेंबरमध्ये होणार माऊलीचे दर्शन

वाचा : दुष्काळ जाऊ दे, आरक्षण टिकू दे – चंद्रकांतदादांचे विठ्ठलाकडे साकडे

वाचा : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

अभिनेता अक्षय कुमार याने माऊलीच्या गाण्याला पसंती दर्शवली आहे. मराठीमध्ये ट्विट करून आपल्याला गाणं आवडल्याच त्याने म्हटलं आहे.

First Published on: November 19, 2018 11:30 AM
Exit mobile version