आरआरआर चित्रपटातील ‘राम चरण’चा पहिला लूक रिलीज

आरआरआर चित्रपटातील ‘राम चरण’चा पहिला लूक रिलीज

आरआरआर चित्रपटातील 'राम चरण'चा पहिला लूक रिलीज

दाक्षिणचे सुपरहिट दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून त्यामुळे चाहत्यांची ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. या सिनेमात राम चरण आणि एनटीआर ज्युनिअरसह बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भटही झळकणार आहेत. दरम्यान, रामचरण याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील त्याच्या भूमिकेचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर रिलीज केले आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचा फर्स्ट लूक रिलीजला मोठी पसंती दिली आहे. जगभरात अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपटदेखील चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया भटच्या वाढदिवसानिमित्त या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. इंस्टाग्राम अकाउंटवर राम चरण याने पहिल्या लूकचे पोस्टर रीलीज केले आहे. यात त्याने ‘ असा एक व्यक्ती जो शौर्य, सन्मान, प्रामाणिकपण या सर्व गोष्टींची व्याख्या सांगेल, मला  ही भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी भाग्यवान आहे’, असेही त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत कॅप्शन लिहिले आहे. एखाद्या योद्ध्याला साजेल असा रामचा लूक आहे. हातात धनुष्य आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असून शरीर सुदृढ आणि लांब केस आहेत. हा सिनेमा १३ ऑक्टोबर २०२१ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘आआरआरआर’ चित्रपट एक कालखंड नाटकावर आधारित असून ज्याची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळात प्रमाणे तयार केली गेली आहे. कथेच्या मध्यभागी दोन स्वातंत्र्यसैनिक आहेत, ज्यात राम चरण आणि एनटीआर ज्युनियर आहेत. हा चित्रपट मूळत: तेलगूमध्ये बनविला जात असून हिंदीसह अन्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे. राजमौली यांचे सिनेमे नेहमीच बिग बजेट आणि लार्जन दॅन लाईफ असतात. प्रत्येक सीनसाठी मेहनत घेत पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्याचप्रमाणे या सिनेमातील दोन सीनसाठी फक्त राजमौली यांनी 40 कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे ‘आरआरआर’ हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कदाचित पहिला चित्रपट आहे.


हेही वाचा – गिरे तो भी टांग उपर अशी फडणवीसांची भूमिका- सचिन सावंत

First Published on: March 27, 2021 3:09 PM
Exit mobile version