नेटिझन्सच्या ट्रोलिंगनंतर सचिन पिळगावकर यांची भावनिक पोस्ट

नेटिझन्सच्या ट्रोलिंगनंतर सचिन पिळगावकर यांची भावनिक पोस्ट

अभिनेता सचिन पिळगावकर

ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ हे गाणं काही दिवसांपूर्वी युट्यूबवर अपलोड झालं होतं. मात्र, या व्हिडिओमुळे सचिन पिळगावकर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. या व्हिडिओवरुन असंख्य लोकांनी सचिन पिळगावकरांवर जोरदार टीका केली. त्यांनतर हा व्हिडिओ युट्यूबवरून हटवण्यात आला. दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी नेटीझन्सच्या ट्रोलिंगला उत्तर देताना फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी हा व्हिडिओ पैशाच्या लालसेपोटी केला नसल्याचे म्हटले आहे. मित्राच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ केला असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी ही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

वाचा ः ‘महागुरुंचे’ मुंबई प्रेम उतू, लोकांची जोरदार टीका

काय आहे हा वाद

सचिन पिळगावकर यांचे ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ असं एक नवीन गाणं काही दिवसांपूर्वी युट्यूबवर अपलोड केलं होतं. ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ हा एक व्हिडिओ अल्बम असून यामध्ये सचिन यांच्यासह अन्य काही कलाकार या गाण्यात होते. मात्र, या व्हिडिओमुळे सचिन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. या व्हिडिओवरुन असंख्य लोकांनी सचिन पिळगावकरांवर जोरदार टीका केल्या आहेत. ‘शेमारु बॉलीगोली’ या अकाउंटवरुन हे ‘मुंबई अँथम’ अपलोड करण्यात आले. या व्हिडिओची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. मराठी आणि हिंदी अशा दोनही भाषांचा या अँथममध्ये समावेश करण्यात आला. स्वत: सचिन पिळगावकर यांनीच हे गाणं गायलं आहे. दरम्यान मराठी प्रेक्षकांनी या व्हिडिओवर खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. व्हिडिओतील गाणं, त्यावरचा डान्स, गाण्याची चाल तसंच त्यातील शब्द या सगळ्याच गोष्टी अत्यंत विनोदी अंगाच्या असल्यामुळे, हे मुंबई अँथम नेटिझन्सकडून ट्रोल केलं गेलं

First Published on: August 29, 2018 7:29 PM
Exit mobile version