घरट्रेंडिंग'महागुरुंचे' मुंबई प्रेम उतू, लोकांची जोरदार टीका

‘महागुरुंचे’ मुंबई प्रेम उतू, लोकांची जोरदार टीका

Subscribe

'मुंबई अँथम' व्हिडिओतील गाणं, डान्स, गाण्याची चाल आणि त्यातील शब्द या सगळ्याच गोष्टी खूप विनोदी असल्याची टीका लोकांनी केली आहे.

मराठीतील अष्टपैलू कलाकार अशी ओळख असलेले ‘महागुरु’ सचिन पिळगावकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. गेले काही महिने लाईम लाईटपासून दूर राहिलेले सचिन पिळगावकर सध्या सोशल मिडीयावर चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत. सचिन पिळगावकरांनी ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ असं एक नवीन गाणं काही दिवसांपूर्वी युट्यूबवर अपलोड केलं होतं. ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ हा एक व्हिडिओ अल्बम असून यामध्ये सचिन यांच्यासह अन्य काही आर्टिस्ट डान्स करताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओमुळे सचिन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. या व्हिडिओवरुन असंख्य लोकांनी सचिन पिळगावकरांवर जोरदार टीका केल्या आहेत. ‘शेमारु बॉलीगोली’ या अकाउंटवरुन हे ‘मुंबई अँथम’ अपलोड करण्यात आले असून, सध्या या व्हिडिओची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांचा या अँथममध्ये समावेश करण्यात आला आहे. स्वत: सचिन पिळगावकर यांनीच हे गाणं गायलं आहे. दरम्यान मराठी प्रेक्षकांनी या व्हिडिओवर खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओतील गाणं, त्यावरचा डान्स, गाण्याची चाल तसंच त्यातील शब्द या सगळ्याच गोष्टी अत्यंत विनोदी अंगाच्या असल्यामुळे, हे मुंबई अँथम नेटिझन्सकडून ट्रोल केलं जात आहे.

सौजन्य- युट्यूब

मुंबईतील एकंदर जीवनशैली आणि मुंबईचं नाईट लाईफ यावर हे गाणं आधारित अाहे. मात्र, गाण्यातून ‘मुंबई लाईफ’ दाखवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कुठेतरी फसला आहे. दरम्यान या व्हिडिओवर टीका करतेवेळी अनेकांनी सचिन पिळगावकर यांनाही टार्गेट केले आहे. ‘सचिन पिळगावकरांसारख्या दिग्गज अभिनेत्याने या अशा व्हिडिओमध्ये काम करणं हे धक्कादायक आहे..’ अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे दिल्या आहेत. काहींनी तर चक्क सोशल मीडियावर या व्हिडिओवर शिव्यांची लाखोली वाहिली आहे. मन्नत फिल्मसने या ‘मुंबई अँथम’ची निर्मिती केली असून, यातील गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकील यांनी केली आहे. तर डीसी द्रविडने या व्हिडिओचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

लोकांकडून टीकांचा वर्षाव

mumbai anthem 2
सौजन्य- युट्यूब
mumbai anthem 1
सौजन्य- युट्यूब
mumbai anthem 3
सौजन्य- युट्यूब
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -