Video: …म्हणून सचिन पिळगांवकर झाले भावूक

Video: …म्हणून सचिन पिळगांवकर झाले भावूक

Video: ...म्हणून सचिन पिळगांवकर झाले भावूक

सगळ्यांचे लाडके सचिन पिळगांवकर आणि हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते यांनी कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. यावेळी जितेंद्र जोशी यांनी त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या असून गप्पागोष्टींसोबत सचिन पिळगांवकर यांनी काही कधी न सांगितलेले किस्से, आठवणी मंचावर चाहत्यांसह शेअर केल्या आहे.

या दोघांमध्ये प्रश्न-उत्तरांचा गेम देखील रंगला. सचिन पिळगांवकर यांनी श्रीया आणि त्यांच्यामध्ये घडलेला एक किस्सासह गुरुदत्त साहेब यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण देखील प्रेक्षकांसह शेअर केली. तसेच यावेळी एका गेममध्ये त्यांना गाणी ओळखायची होती तर दुसर्‍या गेममध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची हो किंवा नाही असे उत्तरं द्यायची होती. भाजीमार्केट मध्ये बार्गेनिंग केले आहे का? यावर दोघांनी हो असे उत्तर दिले तर बायकोसाठी कधी गजरा घेऊन गेला आहात का? अशाच्या प्रश्नांचा हा गेम सुरू राहिला.

त्यानंतर कार्यक्रमातील गेमचा भाग म्हणून सचिन पिळगांवकरांना जेव्हा त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला जातो तेव्हा ते अत्यंत भावूक देखील झाल्याचे पाहायला मिळाले.


हेही वाचा – सोहळ्यादरम्यान पत्नी गौरीचा ड्रेस सांभाळताना दिसला किंगखान; व्हिडिओ व्हायरल


 

First Published on: December 10, 2019 6:15 PM
Exit mobile version