घरमनोरंजनसोहळ्यादरम्यान पत्नी गौरीचा ड्रेस सांभाळताना दिसला किंगखान; व्हिडिओ व्हायरल

सोहळ्यादरम्यान पत्नी गौरीचा ड्रेस सांभाळताना दिसला किंगखान; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडचा किंगखान अभिनेता शाहरूख खानच्या चित्रपटांची जेवढी चर्चा होत असून ते चित्रपट चर्चेत असतात तसेच शाहरूख खानचे वैयक्तिक आयुष्य देखील असते. पत्नी गौरीसोबत असणाऱ्या शाहरूखच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या हनिमून डेस्टिनेशन पर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. नुकताच शाहरूख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये गौरी कोणत्या तरी सोहळ्यातून बाहेर पडताना दिसत आहे. तर तिच्या मागे मागे शाहरूख देखील बाहेर पडताना दिसतो. या सोहळ्यादरम्यान गौरीने भला मोठा ड्रेस घातला असून तो सावरताना शाहरूख या व्हिडिओमध्ये दिसतोय. दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये गौरी ब्लॅक गाउन आणि ग्रीन होलोग्राफिक स्लीव असणाऱ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. तर शाहरूख खान देखील ब्लॅक सूटमध्ये हॅण्डसम दिसतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -