सचिन पिळगावकर म्हणजे कलाक्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विजय गोखलेंनी काढले कौतुकोद्गार

सचिन पिळगावकर म्हणजे कलाक्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विजय गोखलेंनी काढले कौतुकोद्गार

गंधार गौरव पुरस्कार हा आवश्यक असा उपक्रम आहे. आपण सण साजरे करतो. रुढी, परंपरा यांचं आपण जतन केलं पाहीजे आणि संस्कृतीचं पूजन केलं पाहीजे. यामुळे आपल्याला थोरामोठ्यांची आठवण होते. सचिन पिळगावकर म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी दिग्दर्शन, निर्माता, नृत्य, अभिनय, कला आणि विविध क्षेत्रात काम केलं आहे. सचिन पिळगावकर म्हणजे कलाक्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहे. खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी काढले.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते.

गंधार गौरव पुरस्कार 2022 नॉमिनेशन – 
(नाटकांची नावे)
नेपथ्य
1.गोष्टीची गोष्ट 2 जीर्णोद्धार 3विष्णुदास भावे 4रिले 1.0

प्रकाश योजना
1. गोष्टीची गोष्ट 2. तायडी जेव्हा 3.बदलते पक्षांचे कवी संमेलन

रंगभूषा
1. पक्ष्यांचे कवी संमेलन 2.गोष्टीची गोष्ट 3. तायडी जेव्हा बदलते

वेशभूषा
१. गोष्टीची गोष्ट २.पक्षांचे कवी संमेलन ३.वयम मोठम खोटम

पार्श्वसंगीत
1. पक्ष्यांचे कवी संमेलन
२.जीर्णोद्धार
३. आमची काय चूक

लेखक
1. गोष्टीची गोष्ट २. जीर्णोद्धार ३. लहान मुलांची बाप गोष्ट ४. लाभले आम्हास भाग्य

दिग्दर्शक
1. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन 3. तायडी जेव्हा बदलते

बालकलाकार मुलगा
1. शर्व दाते,
2. आरव कांबळे,
3. चैतन्य चव्हाण

बालकलाकार मुलगी
१.अस्मि गोगटे
२. भैरवी जोशी
३. कस्तुरी खैरनार

बालनाट्ये
१. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन ३. जीर्णोद्धार


हेही वाचा : केदार शिंदेंचं लाडक्या लेकीस पत्रं…!


 

First Published on: October 18, 2022 7:45 PM
Exit mobile version