‘कागर’मध्ये दिसणार रिंकू राजगुरूच्या अदा

‘कागर’मध्ये दिसणार रिंकू राजगुरूच्या अदा

लवकरच येणार 'कागर' चित्रपट

रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या ‘कागर’ या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा पहायला मिळत आहेत. या व्हिडिओतून बऱ्याच काळानंतर रिंकू प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा आली आहे.

रिंकूचा नायक गुलदस्त्यात

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. तर उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र या चित्रपटात रिंकूचा नायक कोण आहे, हे अजून गुलदस्त्यातच असून रिंकूचा हा नवा चित्रपट कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ झाला व्हायरल

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर ‘कागर’च्या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रिंकू एका उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे. तसंच ‘लवकरच येतोय कागर’ असं सांगायलाही ती विसरत नाही. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. मात्र, रिंकूच्या या दिलखेचक अदा प्रेक्षकांना नक्कीच भुलवतील यात काहीच शंका नाही

First Published on: July 22, 2018 12:01 PM
Exit mobile version