Shruti Haasanला प्रभासकडून वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट! Salaarचं पोस्टर रिलीज

Shruti Haasanला प्रभासकडून वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट! Salaarचं पोस्टर रिलीज

Shruti Haasanला प्रभासकडून वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट! Salaarचं पोस्टर रिलीज

बाहुबली प्रभासचा (झीोवपोे)  अपकमिंग सालार (Salaar)  या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. सिनेमात अभिनेत्री श्रृती हासन ( Shruti Haasan)  मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या होत्या. निर्मात्यांकडून याबाब कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते. मात्र आज या चर्चांना पूर्ण विराम देत बाहुबली प्रभासच्या सालारचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे ज्यात अभिनेत्री श्रृती हासन प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री श्रृती हासनच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त प्रभास आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांनी तिला हे स्पेशल गिफ्ट दिले.

श्रृती हासन सध्या सालार सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सालार सिनेमात अभिनेता प्रभास आणि श्रृती रोमान्स करताना दिसणार आहे. श्रृती सिनेमात आद्या ही भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये श्रृती सफेद बॉटम्स आणि ग्रे कुर्त्यामध्ये दिसत आहे. पोस्टरमधील श्रृतीच्या थॉटफूल पोझने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सालार हा अँक्शन थ्रीलर सिनेमा असून तेलुगू आणि कन्नड भाषेसह हिंदी, मल्याळम आणि तमिळ भाषेत देखील प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाचे एकूण बजेट 150 करोड रुपये आहे.

सालारचे पोस्टर शेअर करत अभिनेता प्रभासने श्रृतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. प्रभासने म्हटलेय, ‘एंटरटेनिंग अभिनेत्री आणि सेटवर नेहमी उत्साह घेऊन येणाऱ्या श्रृती हासनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’!’ तर सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत लीन यांनी, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा! सिनेमाचा तू एक भाग झाल्याबद्दल तसेच सेटवर दररोज तुझ्या उत्साहाने रंग आणल्याबद्दल तुझे खूप खूप आभार’, असे म्हटले आहे. प्रभासच्या पोस्टवर श्रृतीने प्रभासला डार्लिंग म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. ‘थँक्यू सो मच यूनिव्हर्सल डार्लिंग, बिगेस्ट हग’ असे तिने म्हटले आहे.

श्रृतीने आता प्रभासला डार्लिंग म्हटले असले तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न करु इच्छित होती. नागा चैतन्य आणि समांथा यांचे लग्न होण्याआधी श्रृती हासन नागा चैतन्यसोबत डेट करत होती असे म्हटले जाते. दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट देखील करण्यात आले होते.


हेही वाचा – Gangubai Kathiawadi Release date: अखेर ‘या’ दिवशी रिलीज होणार आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’

First Published on: January 28, 2022 1:30 PM
Exit mobile version