सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

देशात कोरोना व्हयरसने अक्षरश: थैमान घातले आहे. या परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधे, इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच अनेक स्तरावरून मदतीसाठी लोकं धावून येत आहे. बॉलिवूडही काही मागे राहीलं नाही. देशात कोरोनाची बिघडती स्थिती पाहता बॉलिवूडचा भाईजान मदतीसाठी पुढे आला आहे. पहिल्यांदा जेव्हा लॉक डाऊन लागू करण्यात आले होते तेव्हा देखील सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो मजुरांना आर्थिक मदतीसाठी साह्य केले होते. तसेच कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील मजुरांना 25 हजार रुपयांची मदतीची घोषणा केली आहे. सलमान वेळोवेळी लोकांच्या मदतीसाठी धावून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी अधिकृतपणे माहिती  जाहीर करत संगितले आहे की, गेल्यावर्षी आम्ही संस्थेच्या वतीने 26 हजार कामगारांची आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचे सर्व डिटेल्स पाठविण्यात आले होते. त्याच्याकडे आधीपासूनच असलेल्या यादीतील नावांपैकी 25 हजार गरजू लोकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीमध्ये चित्रपटसृष्टीशी निगडीत कर्मचार्‍यांना समावेश आहे. सलमान खानने एकूण 25 हजार कर्मचार्‍यांच्या खात्यात 3.75 कोटी रूपायांपैकी प्र्त्येकी 1500 रुपये टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानच्या ‘बिंग ह्यूमन फाऊंडेशन’ तर्फे 2 लाख गरजू मजुरांना तसेच हजारो मजुरांना अन्नधान्य पुरवठा आणि आर्थिक मदतीसाठी हातभार लावण्यात आला होता. सलमानचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘राधे’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून होणारी सर्व कमाई कोरोनाव्हायरसच्या रूग्णांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.


हे हि वाचा- अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

First Published on: May 8, 2021 2:14 PM
Exit mobile version