मोदींनी केलेल्या ट्विटचे सलमान खानने दिले असे उत्तर

मोदींनी केलेल्या ट्विटचे सलमान खानने दिले असे उत्तर

अभिनेता सलमान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून निवडणुकीचा प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लोकांमध्ये बॉलिवूड अभिनेत्यांची क्रेझ असल्याने निवडणुकीत कलाकारांचा उपयोग करुन घेतात. निवडणुकीच्या पहिल्या चरणाला ११ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीसंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून संदेश दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान आणि मीस्टर परफेक्ट आमिर खान या दोघांना टॅग केले आहे. या निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना वोट करण्याचे आव्हान या दोन कलाकारांमार्फत मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मार्च रोजी हे ट्विट केले होते. होळीच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान याने या ट्विटला उत्तर दिले आहे.


काय होतं ट्विट 

“मतदान हा फक्त अधिकार नसून ते एक कर्तव्य आहे. प्रिय, सलमान खान आणि आमिर खान, आपले लोकशाही आणि आपला देश वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांना मतदान करण्यास तुमच्याकडून आवाहन करावे.” – पंतप्रधान, नरेंद्र मोदी


काय दिलं सलमानने उत्तर 

पंतप्रधानाच्या ट्विटला अभिनेता सलमान खानने नऊ दिवसांनी उत्तर दिले आहे. “आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे. सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडावे आणि मतदान करावे. योग्य सरकार बनवण्यात आपला हाथभार लावावा.” – अभिनेता, सलमान खान

First Published on: March 21, 2019 3:44 PM
Exit mobile version