Salman Khan Viral Meme:भाईचा बड्डे अन् चर्चा मात्र सापाची

Salman Khan Viral Meme:भाईचा बड्डे अन् चर्चा मात्र सापाची

Salman Khan Viral Meme:भाईचा बड्डे अन् चर्चा मात्र सापाची

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)आज 56 वा वाढदिवस आहे.  मात्र या खास दिवशी सलमानची चर्चा होण्याऐवजी सापाची चर्चा जास्त होतेय. (Salman Khan Viral Meme)वाढदिवसाच्या एक दिवस आगोदर सलमान खानसोबत अघटीत प्रकार घडला. सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर त्याला सर्पदंश झाल्यानतंर सोशल मीडीयावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. काही जण भाईजानच्या काळजीपोटी त्याची विचारणा करत आहेत तर काहींनी मीम्स बनवायला सुरूवात केलीये.(Salman khan gets bitten by snake memes goes viral )

सलमानला सर्पदंश झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स मेकर्सला आयत कोलीत मिळालं आहे. मग काय एकापाठोपाठ एक भन्नाट मीम्स व्हायरल होण्यास सुरूवात झालीये. मात्र फार्महाऊसवर नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊयात.

सलमान खानला बिनविषारी साप चावल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सलमानने खुद्द त्याच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली यानंतर चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला मात्र मिम्स मेकर्सला एक नवा कोरा विषय हाती मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची पूर्व गर्लफ्रेंड कतरीना कैफ आणि विक्की कौशल यांचा विवाहाची चर्चा सुरू झाल्यापासून सलमानच्या मागे ट्रोलींगच शुक्लकाष्ठ लागल्याचे दिसून येतंय. यानंतर हे मीम्स काही थांबायचं नाव घेत नाहीये.  सोशल मीडियावर अक्षरक्ष: मीम्सचा पाऊस पडतोय. काहींनी या घटनेचा संदर्भ सलमानने केलेल्या काळवीटाच्या शिकारीशी जोडण्यास सुरुवात केलीये

हे हि वाचा –  सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; ‘Birthday’ च्या दिवशीच सांगितले किस्से 

 

First Published on: December 27, 2021 4:52 PM
Exit mobile version