भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा करा सन्मान!

भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा करा सन्मान!

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या पनवेल फार्महाऊसमध्ये वेळ घालवत आहे. सलमानने एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो चिखलात माखलेला दिसत आहे. तो आपल्या फार्महाऊसमध्ये शेती करीत असल्याचे या फोटोतून दिसून येत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे- सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करा. सध्या सलमानचे चाहते हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल करताना दिसताय.

 

काही दिवसांपुर्वीच सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो डोंगराच्या हिरव्यागार शेतात फिरताना दिसला होता. तर एका फोटोत सलमान खान वाऱ्यावर बेभान डोलणाऱ्या पिकांच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे – “दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम.. जय जवान! जय किसान!”

यापूर्वी सलमान खानच्या बॉडीगार्डने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो पावसाचा आनंद लुटताना दिसला होता. सलमानचा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लीजेंड को फॉलो करते हुए। मेरे मालिक।” त्यात सलमान पाण्याजवळ किंवा नदीकाठी निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ सलमानच्या पनवेल फार्महाऊसचा असल्याचे सांगितले जात आहे, जिथे सलमान सध्या त्याचा वेळ घालवत आहे.

सलमानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर सलमान ‘राधे’ चित्रपटात दिसणार आहे. दिशा पाटनीसह हा अ‍ॅक्शन ड्रामा फिल्म यंदा ईदवर रिलीज होण्याची अपेक्षा होती, पण लॉकडाऊनमुळे उशीर झाला. यामध्ये रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफसुद्धा दिसणार आहेत.


 

First Published on: July 14, 2020 7:01 PM
Exit mobile version