Video – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सलमान खानने खाल्ला गुरांचा चारा!

Video – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सलमान खानने खाल्ला गुरांचा चारा!

अभिनेता सलमान खान

सध्या सलमान खान लॉकडाऊनमुळे आपल्या फार्महाऊसवर आडकला आहे.  सलमान आणि त्याचा भाचा सध्या फार्महाऊसवर क्वारंटाईन टाईम स्पेंड करत आहेत. सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. फार्महाऊसवरचे अनेक सलमान अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण नुकताच सलमानने शेअर केलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घोड्याबरोबर सलमान ब्रेकफास्ट करताना दिसतोय. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचडं व्हायरल झाला असून त्याच्या चाहत्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.

अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना घरातून बाहेर पडू नका असं सांगितलं आहे. हे सांगताना त्याचा प्रसिद्ध डायलॉग ‘जो डर गया, समझो मर गया’ या डायलॉगचा आधार घेत हे पटवून दिलं आहे की, ‘जो डर गया, समझो बच गया’ हा या परिस्थीतीत योग्य डायलॉग आहे. त्यामुळे तुम्ही घरीच रहा, नसतं साहस करू नका. असा सल्ला दिला आहे.

First Published on: April 11, 2020 12:00 AM
Exit mobile version