Video: करोनामुळं घरी थांबलेला सलमान खान दाखवतोय आपलं टॅलेंट

Video: करोनामुळं घरी थांबलेला सलमान खान दाखवतोय आपलं टॅलेंट

सलमान खानचा नवा छंद

करोना विषाणूचा कहर थांबविण्यासाठी मुंबईत अनेक गोष्टी लॉकडाऊन झाल्या आहेत. बॉलिवूड देखील याला अपवाद नाही. थिएटर, शुटिंग लोकेशन पुर्णपणे लॉक डाऊन झाल्यामुळे अनेक सेलिब्रिटी घरीच थांबले आहेत. चित्रपटांचे रिलीज, शुटिंग, प्रमोशन असे काहीच काम नसल्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपले छंद जोपासताना दिसत आहेत. बॉलिवूडचा भाई सलमान खान सुद्धा घरीच थांबला असून त्याने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये उत्तम स्केच बनवताना आपल्याला दिसतोय.

सलमान खानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो एका कागदावर स्केच रेखाटायला सुरुवात करतो. अगदी काही मिनिटांमध्ये तो हे स्केच पुर्ण करतो. दोन महिलांच्या चेहऱ्याचे स्केच त्याने काढलेले आहे. सलमानच्या या व्हिडिओवर आता चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सची बरसात सुरु केली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला सहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

सलमानने याआधी देखील अनेकवेळा चित्र रेखाटलेली आहेत. मात्र यावेळी करोना व्हायरस आणि त्यामुळे भारतात पसरलेला तणाव या पार्श्वभूमीवर त्याने काढलेले हे चित्र अनेकांना अलगीकरणाच्या वेळात काय करावे, याबाबत प्रेरणा देऊ शकेल. चित्रपटाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सलमान सध्या ‘राधे: युअर मोस्ट वॉटेंड हिरो’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी आणि रणदीप हुडा दिसणार आहेत.

 

 

First Published on: March 19, 2020 11:41 AM
Exit mobile version