सलमान खान ‘या’अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच

सलमान खान ‘या’अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच

सलमान खान

आजपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांना सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच सलमान खानने लॉंच केले. खऱ्या अर्थाने सलमान हा अनेक कलाकारांचा गॉडफादर ठरला आहे. आजपर्यंत सलमानने कतरिना कैफ,डेझी शाह,जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक नवोदित कलाकारांना सलमानमुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली. आता आणखी एका अभिनेत्रीला सलमान बॉलिवूडमध्ये लाँच करायला सज्ज झाला आहे. मोहनीश बहेलची मुलगी आणि दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात प्रनुतन बहलाल सलमान बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

मोहनीश बेहल

सलमान प्रनुतनला लॉंच करणार म्हटल्यावर तीचा बॉलिवूड एन्ट्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. सलमान आणि मोहनीश बहल यांची मैत्री जुनी आहे. हम आपके है कोन? हम साथ साथ है अशा चित्रपटांमधून या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटात मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भुमिका साकारली होती.


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयी माहीती दिली आहे. या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे, तो म्हणजे झहीर इक्बाल. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स करणार आहे. तर नितीन कक्कर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शुटींग काश्मीरमध्ये पार पाडणार आहे.

First Published on: September 17, 2018 3:30 PM
Exit mobile version