कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त भाईजानने केली स्पेशल Insta पोस्ट!

कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त भाईजानने केली स्पेशल Insta पोस्ट!

कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त भाईजानने केली स्पेशल Insta पोस्ट!

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफ आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करतेय. लंडनमध्ये जन्मलेल्या कतरिनाला हिंदी भाषेचे काही ज्ञान नसले तरीही तिने आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टारडम अर्थात स्वतःची ओळख आणि चाहता वर्ग मिळविला आहे. कतरिनाच्या वाढदिवशी तिच्या अनेक चाहत्यांनी आणि जवळच्या मित्रांनी तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. तर कतरिनाचा खास मित्र सलमान खाननेही तिच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केले असून कतरिनाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले आहे ज्यात दोन्ही स्टार एकत्र दिसताय. विशेष म्हणजे लंडनमध्ये मॉडेलिंग करणार्‍या कतरिना कैफला कैजाद गुस्ताद यांनी ‘बूम’ या चित्रपटात कास्ट केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर सारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, जरी या नंतर कतरिनाला राम गोपाल वर्माच्या सरकारमध्ये चांगली भूमिका मिळाली होती.

२००५ मध्ये पहिल्यांदा दोघांनी एकत्र काम केले

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर सलमान खानने कतरिनाला आपल्या सिनेमांमध्ये संधी देण्यास सुरूवात केली. दोन्ही स्टार पहिल्यांदा २००५ मध्ये मैने प्यार क्यों किया या चित्रपटात एकत्र अभिनय करताना दिसले होते.

सलमान आणि कतरिनाचं स्पेशल नातं

रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिनाने बऱ्याचदा एकमेकांना डेटही केले, मात्र काही काळाने डेटिंगनंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर रणबीर कपूरही कतरिनाच्या आयुष्यात आला होता. पण रणबीर आणि कतरिनाचे नातंही फार काळ टिकलं नाही. पण असे असूनही कतरिना आणि सलमानची मैत्री कायम राहिली आणि दोघांनी ऑनस्क्रीन अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. एकत्र काम करत असताना त्यांच्याती मैत्री नेहमी प्रेक्षकांना दिसून येते.

यासारख्या चित्रपटात केले एकत्र काम

टायगर जिंदा है, भारत, एक था टायगर, पार्टनर आणि बॉडीगार्ड सारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले, याशिवाय युवराज आणि हॅलो यासारख्या चित्रपटांसह या दोन्ही स्टार्सनी बर्‍याच चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहेत. झिरो, तीस मार खान आणि अजब प्रेम की गजब कहानी या सारख्या कतरिना स्टारर चित्रपटात सलमानने कॅमिओ भूमिका देखील साकारल्या आहेत.


Photo : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा ‘हॉट’ अंदाज!
First Published on: July 16, 2020 8:39 PM
Exit mobile version