सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धुरळा; लवकरच करणार 100 कोटी पार

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धुरळा; लवकरच करणार 100 कोटी पार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींची कमाई केली होती. तसेच तिसऱ्या दिवशी 25-27 कोटींची कमाई केली आहे. तसेच सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाने 10.50 कोटी कमावले आहेत. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने एकूण 75 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट लवकरच 100 कोटीचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित

‘किसी का भाई किसी की जान’ 100 हून अधिक देशांमध्ये 1200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्याचवेळी, हा चित्रपट जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. मोठ्या प्रमाणात रिलीज होऊनही, चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन अपेक्षेपेक्षा थोडे कमी होते. या चित्रपटाने जगभरात 30 कोटींची कमाई केली आहे.

 


हेही वाचा :

68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ ला अनेक नामांकने

First Published on: April 25, 2023 10:35 AM
Exit mobile version