समंथाने खरेदी केलं हैदराबादमधील नागा चैतन्यचं घर

समंथाने खरेदी केलं हैदराबादमधील नागा चैतन्यचं घर

आपल्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे वारंवार चर्चेत असणारी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही महिन्यांपासून समंथा आणि नागा चैतन्य एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.मात्र आता पुन्हा या दोघांच्या जोडीबाबत एक चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार समंथा एक नवं घर खरेदी केलं आहे. पण हे घर दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नसून नागा चैतन्यचं आहे. लग्नानंतर समंथा नागा चैतन्यसोबत त्याचं घरामध्ये राहायची.

घराशी जोडलं भावनिक नातं
समंथाने हैदराबाद येथील जे घर विकत घेतलं आहे. ते समंथासाठी खूप खास असल्याचं म्हटलं जात. समंथा लग्नानंतर नागा चैतन्यसोबत त्याचं घरामध्ये राहायची. घराच्या नव्या मालकाने सांगितलं की, समंथा आणि नागा चैतन्य दोघं एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर ते घर विकलं गेलं होतं. समंथाने नव्या घरमालकासोबत बोलणी करून हे घर स्वताः विकत घेतलं. सध्या समंथा तिच्या आईच्या घरामध्ये राहाते.


हेही वाचा :‘बस बाई बस’मध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळेंनी दिलं मजेशीर उत्तर

First Published on: July 29, 2022 11:53 AM
Exit mobile version