‘बस बाई बस’मध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळेंनी दिलं मजेशीर उत्तर

या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे राजकीय तसेच खासगी आयुष्याबाबत गप्पा मारताना दिसत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ अभिनेता सुबोध भावेने नुकताचं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे

अभिनेता सुबोध भावे मराठी टेलिव्हिजन वाहिनीवर येत्या काळात ‘बस बाई बस’ हा नवा कोर अनोखा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या सर्वत्र याचं कार्यक्रमाची चर्चा सुरू असून महिलांसाठी खास असलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करणार आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्त्रियांना आमंत्रित केलं जाणार आहे. दरम्यान, नुकताच या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड पाड पार पडला आहे. या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. सध्या या एपिसोडचा प्रोमो टेलिव्हिजनवर प्रसारित झाला आहे.

या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे राजकीय तसेच खासगी आयुष्याबाबत गप्पा मारताना दिसत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ अभिनेता सुबोध भावेने नुकताचं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेथील स्त्रिया सुप्रिया सुळे यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी एक गमतीशीर उत्तर दिलं.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं? या प्रश्नावर उत्तर देत सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, त्यावेळी मी झोपले होते. असं म्हणत त्या हसू लागल्या. सध्या हा एपिसोड मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये त्यांनी राजकारणातील अनेक दिग्गजांबद्दल वक्तव्य केलं.


हेही वाचा :सुबोध भावेला झाली त्याच्या जुन्या मालिकांची आठवण; सुबोधची पोस्ट चर्चेत