संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात मराठीतील ‘या’ ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात मराठीतील ‘या’ ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यंदाच्या यादीत मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ कलाकारांनी स्थान मिळवलं आहे. संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. नुकतीच संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची नुकतीच करण्यात आली आहे. शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी यादी जाहीर झाली. यावर्षी 2019 ते 2021 या तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे जाहीर करण्यात आले आहेत. जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि ज्येष्ठ अभिनेत्री-लेखिका मीना नाईक आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संगीत नाटक अकादमी’च्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.

जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या संदर्भात माहिती दिली. एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालाया आहे. असेच प्रेम असु द्या’, असे प्रशांत दामले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही क्षेत्रांत मुसाफिरी करणारे अभिनेते अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे. नुकताच त्यांनी त्यांच्या नाटकांच्या कारकिर्दीतील 10,500 वा प्रयोग सादर केला.

प्रश्नात दामले यांच्या सोबतच अभिनेत्री-निर्माती मानवा नाईक हिनेसुद्धा एक पोस्ट शेअर करत तिच्या आईला म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री-लेखिका मीना नाईक यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली. ‘मला हे सांगताना खूप आनंद होतोय की, माझी आई मीना नाईक हिला संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना देखील संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी संगीत नाटक अकादमी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा करते. मराठी चित्रपट, नाटक आणि गायन क्षेत्रात या तीनही दिग्गज कलाकारांचे महत्वाचे योगदान आहे.


हे ही वाचा –  ‘नटसम्राट’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत विक्रम गोखलेंचे मनोरंजन सृष्टीत मोठे योगदान

First Published on: November 26, 2022 3:17 PM
Exit mobile version