सानिया मिर्झाकडून एमसी स्टॅनला लाखोंचं गिफ्ट

सानिया मिर्झाकडून एमसी स्टॅनला लाखोंचं गिफ्ट

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅन बिग बॉसपासून सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या हटके स्टाईलचे देखील अनेक चाहते आहेत. अशातच एमसी स्टॅन आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाकडून त्याला एक महागडी भेट मिळाली आहे. ज्यामुळे सध्या एमसी स्टॅन भलताच खूश झाला आहे. या भेटवस्तू मिळाल्यानंतर एमसी स्टॅनने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत सानियाचे आभार मानले आहेत.

सानिया मिर्झाकडून एमसी स्टॅनला महागडं गिफ्ट

खरं तर, गेल्या महिन्यात भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झा हैदराबादच्या लाल बहादूर टेनिस स्टेडियमवर शेवटचा सामना खेळताना दिसली. बिग बॉस 16 चा विजेता रॅपर एमसी स्टेनला कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्टेनने तिथे येऊन परफॉर्म केले आणि सानियाची कारकीर्दही साजरी केली. त्यावेळी एससी स्टेनच्या परफॉर्मंसवर खूश झाल्याने सानियाने त्याच्यासाठी 91,000 रुपयांचे नायके शूज आणि 30,000 रुपये किमतीचे सनग्लासेस भेट दिले आहेत. स्टॅन या भेटवस्तूंमुळे खूप खूश झाला असून त्याने सानियाचे आभारही मानले आहेत. एमसी स्टॅनने सानिया मिर्झाकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिला ‘आपा’ (उर्दूमध्ये मोठी बहीण) संबोधून तिचे आभार मानले आहेत.

एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झाची मैत्री

एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा, फराह खानच्या मुंबई पेंटहाऊसमध्ये ‘बिग बॉस 16’ च्या पोस्ट-फिनाले पार्टीमध्ये भेटले. ते लगेचच एकमेकांचे मित्र झाले. विशेष म्हणजे, स्टॅनने सानिया मिर्झाच्या मागणी करुन हैद्राबाद येथे टेनिस रिटायरमेंट बॅशमध्येही परफॉर्म केला होता.

 


हेही वाचा :

वयाच्या 11 व्या वर्षापासून रणबीरच्या प्रेमात होती आलिया

First Published on: April 14, 2023 11:07 AM
Exit mobile version