‘संजू’ने मागे टाकलं ‘बाहुबली’ सिनेमाला!

‘संजू’ने मागे टाकलं ‘बाहुबली’ सिनेमाला!

‘संजू’ या सिनेमाची सध्या देशभरात लाट पसरली आहे. संजू सिनेमाची आणि त्यातील रणबीर कपूरच्या अभिनयाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. संजू सिनेमा अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असून, सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची मुख्य भूमिका साकारली आहे. प्रेक्षागृहात तूफान पसंती मिळत असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. इतकंच नाही तर दमदार कमाई करत संजूने एक नवा रेकॉर्डही बनवला आहे. या रेकॉर्डनुसार संजू सिनेमाने चक्क बाहुबली-2 ला मागे टाकलं आहे. याआधी एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली-२ या सिनेमाच्या नावावर होता.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन ही माहिती शेअर केली आहे. संजू या सिनेमाने एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा नवा रेकॉर्ड बनवल्याचं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तरुण आदर्श यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी संजूने ४६.७१ कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई देशभरातल्या सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई ठरली आहे. याआधी बाहुबली २ सिनेमाने पहिल्याच दिवशी ४६.५० कोटींची कमाई केली होती.

आतापर्यंत संजू सिनेमाने जवळपास २०० कोटींची कमाई केली असून, २०१८ मधील संजू हा बॉक्सऑफिसवरील सर्वात हिट सिनेमा ठरला आहे.

संबंधित बातमी :  ‘संजू’सोबतच राजकुमार हिरानी यांचाही रेकॉर्ड…

First Published on: July 3, 2018 3:30 PM
Exit mobile version