घरमनोरंजन'संजू'सोबतच राजकुमार हिरानी यांचाही रेकॉर्ड

‘संजू’सोबतच राजकुमार हिरानी यांचाही रेकॉर्ड

Subscribe

संजू चित्रपटासोबतच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या चित्रपटांच्या कमाईचाही रेकॉर्ड बनवला आहे. दोनच दिवसात संजू चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याची घोडदौड जोरदार सुरू आहे. पहिल्या दिवसातच या चित्रपटाचे ७३.३५ कोटींची कमाई केली आहे. दररोज नवनवे रेकॉर्ड बनवणाऱ्या या चित्रपटासोबत त्याचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याही रेकॉर्डची चर्चा बॉलीवूडमध्ये होत आहे. दोन दिवसांच्या आत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची सर्वात कमी वेळात झटपट कमाई करणारा तिसरा हा ‘संजू’ चित्रपट बनला आहे. ‘संजू’ने त्यांच्याच ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

pk
सर्वाधीक कमाई करणारा पीके

दिग्दर्शक राजू हिरानी यांचे टॉप पाच चित्रपट –

  1. पीके – ३४० कोटी
  2. ३ इडियट्स – २०३ कोटी
  3. संजू – ७३.३५ कोटी (फक्त दोन दिवसात)
  4. लगे रहो मुन्नाभाई – ७२ कोटी
  5. मुन्नाभाई – ५०.५० कोटी

कमाईचा रेकॉर्ड 

‘संजू’ चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता रणबीर कपूरचे चहुबाजूंनी कौतुक होत आहे. शिवाय परेश रावल, मनिषा कोईराला, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि विक्की कौशल यांच्याही अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे पुढील दिवसांत हा चित्रपट तुफान कमाई करेल यात शंका नाही.

- Advertisement -

राजू हिरानींवर टीका 

raju hirani and sanjay dutt
राजू हिरानी आणि संजय दत्त (प्रातिनिधिक चित्र)

राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’ चित्रपटातून नवीन रेकॉर्ड बनवला असला तरी त्यांच्यावर आपल्या मित्राची प्रतिमा साफ करण्याचा आरोपही लावला जात आहे. संजय दत्त हे राजू हिरानीचे आवडते कलाकार आहेत. त्यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्यामुळे संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ मधून आपल्या मित्राला रिअल लाइफ हिरो दाखवण्याचा प्रयत्न राजू हिरानी यांनी केला असल्याचे काही समीक्षकांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -