संपूर्णपणे बंजारा भाषेतील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संपूर्णपणे बंजारा भाषेतील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संपूर्णपणे बंजारा भाषेतील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा ‘संत मारो सेवालाल’ हा चित्रपट ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे बंजारा भाषेतील आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

माँ भवानी फिल्म आणि स्वामी स्टार आर्ट अँड प्रॉडक्शन निर्मित ‘संत मारो सेवालाल’ या चित्रपटाची निर्मिती अशोक तुकारामराव कामले यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अरूण मोहन राठोड, जीतेश राठोड यांनी छायांकन आणि बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राठोड यांनी संत सेवालाल यांची प्रमुख भूमिका साकारली आहे.

दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी या समस्या मांडतानाच ‘संत सेवालाल’ यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश असे या चित्रपटाचं कथानक आहे. बंजारा समाजासाठी महत्त्वाचा असलेला हा चित्रपट संपूर्ण भारतीय प्रेक्षकांनाही विचार देणारा आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि संत सेवालाल यांच्याविषयी कुतूहल निर्माण करणारं असून हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.

First Published on: November 17, 2020 5:27 PM
Exit mobile version