पाण्यावरून सपना चौधरीची सासरच्यांशी भांडणं!

पाण्यावरून सपना चौधरीची सासरच्यांशी भांडणं!

पाण्यावरून सपना चौधरीची सासरच्यांशी भांडणं!

भोजपूरी, पंजाबी आणि हरियाणवी सिनेमातील डान्सर क्विन आणि ‘बिग बॉस ११’ फेम सपना चौधरी (Sapna Choudhary) बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सपना चौधरी आपल्या चाहत्यांसाठी नवं गाणं घेऊन आली आहे. या गाण्यात सपना चौधरी खूप मजेदार अंदाजात दिसत आहे. तिचा या हरियाणवी गाण्यात सनी देओलचा (Sunny Deol) देखील उल्लेख केला आहे. सपना चौधरीचं लेटेस्ट गाणं ‘नलका’ (Nalka) प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सपना एका वेगळ्याचं भूमिकेत दिसत आहे. युट्यूबवर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट सध्या वर्षाव होत आहे.

सपना चौधरीचं (Sapna Choudhary New Haryanvi Song) हे नवं हरियाणवी गाणं ‘नलका’ रुचिका जांगिड आणि वीनू गौरने गायलं आहे. यामध्ये सपना चौधरीसोबत मोहित जांगडा अभिनय करताना दिसत आहे. या हरियाणवी गाण्याचे लिरिक्स आमिन बडौदीने लिहिले असून म्युझिक जीआर म्युझिकचं आहे. हे गाणं सोनोटेक युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केलं आहे. आता पर्यंत युट्यूबवर या गाण्याला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. चाहत्यांना सपनाचं हे नवं गाणं खूपच आवडत आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालं तर, सपना चौधरीचे पंजाबी, भोजपुरी आणि हरियाणवी सिनेमांमध्ये एक लोकप्रिय नाव आहे. याशिवाय तिने बॉलिवूडमध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे. कलर्सवरील लोकप्रिय शो बिग बॉस सीझन १२मध्ये तिने धुमाकूळ घातला होता. आता ती बऱ्याच काळानंतर या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


हेही वाचा – सोनू सूदमुळे १२ वर्षानंतर तरुण राहिला स्वतःच्या पायावर उभा!


 

First Published on: December 7, 2020 5:55 PM
Exit mobile version