आणि सारा झाली भावूक…

आणि सारा झाली भावूक…

सारा अली खान

यावर्षी बरेच चांगले चित्रपट आले आणि येतही आहेत. रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या सिम्बाचीदेखील खूपच चर्चा आहे. सारा अली खानचे यावर्षी दोन चित्रपट येणार असून ती केदारनाथमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर करण जोहर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा हा चित्रपटही तिच्यासाठी खास आहे. नुकतंच तिच्या सिम्बा चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून सारा अतिशय भावूक झाली आणि तिने सोशल मीडियावरही यासंदर्भात पोस्ट केले.

काय आहेत साराच्या भावना?

आणि आता चित्रीकरण संपलं. रोहित शेट्टी सर तुमचे धैर्य, सल्ला, दिशा, चिंता, दयाळूपणा, काळजी आणि सगळ्याच बाबींसाठी मनापासून धन्यवाद असे म्हणत साराने आपल्या पोस्टला सुरुवात केली. रणवीर सिंह तू खरंच खरा स्टार आहेस. तुझा उत्साह आणि सकारात्मकता ही अतुलनीय बाब आहे. कामात झोकून देणं नक्की काय असतं हे तुमच्याकडे पाहून मला कळलं. यातूनच तुम्ही दोघं नक्की तुम्ही दोघं म्हणून का ओळखले जाता हे मला कळलं. ही जागा नक्की तुम्ही कशी मिळवली हे मला जाणवलं. असंही पुढे साराने भावूक होत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. केवळ साराच नाही तर रोहित शेट्टीही भावूक झाला. पाच महिन्यापूर्वी जून २०१८ मध्ये सिम्बाचा प्रवास सुरु केला होता आणि आता हा प्रवास संपला आहे. माझ्या मनात अनेक मिश्र भावना आहेत. सिम्बा म्हणजेच संग्राम भालेराव. माझा रणवीरबरोबर हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याच्याबरोबर काम करणं खूपच मनोरंजक होतं अशी पोस्ट रोहितने लिहिली आहे. इतकंच नाहीतर एका चांगल्या आणि उत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम करायला मिळालं जो आपल्या कामाप्रती इतका इमानदार आणि खरा आहे. मी आणि माझी पूर्ण टीम शपथेवर सांगू शकतो की, रणवीर सिंगपेक्षा सिम्बा कोणीही चांगलं साकारू शकत नाही, असंही रोहितने म्हटलं आहे.

 

सिम्बा २८ डिसेंबरला भेटीला

रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट २८ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचं नुकतंच चित्रीकरण संपलं असून आता पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात होईल. त्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर रणवीरचा हा पहिलाच चित्रपट असेल. सर्वांनाच या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.

First Published on: November 7, 2018 3:55 PM
Exit mobile version