खोडकर सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल

खोडकर सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री सारा अली खानचा या दिवसांत बॉलीवूडमध्ये खूपच बोलबाला आहे. केदारनाथ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली सारा लवकरच कूली नंबर वन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण तत्पूर्वीच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सारा निरागस दिसत आहे. खुद्द सारानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

साराने शेअर केलेला व्हिडीओ तिच्या केदारनाथ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये सारा अली खाना अभिनेता रणबीर कपूरच्या बदतमीज दिल या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. त्यानंतर ती स्वतः टाळ्या वाजवत दाद देत आहे. या दरम्यान चित्रीकरणादरम्यान सारा तिच्या कास्ट आणि क्रू मेंम्बर्ससोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओतील साराच्या अंदाजावर सर्वच जण खूप फिदा झाले आहेत.

लवकरच सारा कूली नंबर वन या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती बॉलीवूड अभिनेता वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. १ मे २०२० पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा मुख्य भूमिकेत दिसेल.

 

First Published on: December 9, 2019 9:57 AM
Exit mobile version