एकेकाळी या ‘राजकीय’ घराण्याशी होते साराचे संबंध…

एकेकाळी या ‘राजकीय’ घराण्याशी होते साराचे संबंध…

बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केलेल्या अभिनेत्री सारा अली खान अगदी कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली.  ‘केदरनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपटांतून साराने जगभरातील लोकांवर आपल्या अभिनयाची जादू केली. साराच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तर यश मिळवलंच पण त्यासोबतच त्यातील साराच्या अभिनयाचंही भरभरुन कौतुक झालं. दरम्यान, सध्या यशाची चव चाखत असलेल्या साराने एका मुलाखतीदरम्यान एक वेगळाच खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून साराचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले जात आहे. मात्र, नुकतंच एका मुलाखतीदरम्यान साराने तिच्या अफेअरविषयी आणि बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लव्ह लाईफची अनेक सिक्रेट्स उलगडली आहेत. तिने आपल्या बॉयफ्रेंडविषयी सांगितलेली माहिती ऐकून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असणार हे नक्की. संबंधित शोमध्ये साराला ‘तू सिंगल आहेस की नाही?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सारा म्हणाली, की ‘मी आजपर्यंत कधीच कुणाला धोका दिला नाही किंवा कुणाचे मन दुखावले नाही. मात्र, मी एकदाच रिलेशनशीपमध्ये होते. तो मुलगा एका राजकीय नेत्याचा नातू होता.’ साराच्या या खुलास्यामुळे एकेकाळी तिचे संबंध राजकीय घराण्याशी होते, अशी चर्चा रंगते आहे.

कोण होता ‘तो’?

उपलब्ध माहितीनुसार, सारा अली खानने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याला डेट केलें होतं. या दोघांनी २०१६ मध्‍ये डेटिंग सुरू केलं होतं. मात्र, १ वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. वीर हा सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती यांचा मुलगा आहे. मध्यंतरी सारा आणि वीर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या दोघांना पार्टींमध्ये एकत्र पाहिलं देखील गेलं होतं. शिवाय त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, त्याबाबत विचारणा केली असता साराने वेळेवेळी त्या वृत्ताचं खंडन केलं होतं. मात्र, अलीकडेच साराने त्याबाबत जाहीर खुलासा केला आहे.

सारा आणि वीर

दरम्यान, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफ अली खानने मुलगी सारा अली खानच्या बॉयफ्रेंडला एकदा  भेटल्याचा खुलासा केला होता. ‘साराचा बॉयफ्रेंड अनेकदा आमच्या घरी आला होता आणि मी त्याचासोबत ड्रिंक्सची मजा घेतली होती, असंही सैफ शोमध्ये म्हणाला होता. आता साराचा ‘तो’ बॉयफ्रेंड वीरच होता का अन्य कुणी? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 

First Published on: January 29, 2019 7:52 PM
Exit mobile version