घरमनोरंजनसारा अली खान, ईशान खत्तर ठरले ‘टॉप डेब्यूटंट ऑफ दि इयर’!

सारा अली खान, ईशान खत्तर ठरले ‘टॉप डेब्यूटंट ऑफ दि इयर’!

Subscribe

'स्कोर ट्रेंड्स इंडिया'च्या डेब्यूटांट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय 'डेब्यूटांट ऑफ दि इयर' बनली आहे. सारा अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर येत आहे. तर दूसरीकडे अभिनेत्यांमध्ये ईशान खट्टर जास्त लोकप्रिय ठरला आहे.

सध्या सारा अली खानची फिल्म ‘सिम्बा’ ब्लॉकबस्टर झाल्याची चर्चा असतानाच ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’कडून सारा अली खानला दूहेरी आनंद मिळाला आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या डेब्यूटंट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय ‘डेब्यूटंट ऑफ दि इयर’ बनली आहे. सारा अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर येत आहे. तर दूसरीकडे अभिनेत्यांमध्ये ईशान खट्टर जास्त लोकप्रिय ठरला आहे. करण जोहरच्या ‘ध़डक’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या जान्हवी कपूरला मागे टाकत साराने पहिले स्थान पटकावले आहे. बॉलीवूडमध्ये २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सारानंतर जान्हवीचाच दूसरा क्रमांक आहे. २०१८ मध्ये साराच्या ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे दोन फिल्म्स रिलीज झाल्या. तर ईशानचेही ‘बिय़ॉन्ड दि क्लाउड्स’ आणि ‘धडक’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते.

डिजिटल न्यूजमध्ये सारा तिसरी

बॉलीवूड अभिनेत्रींच्या २०१८च्या रँकिंगमध्ये डिजिटल न्यूजमध्ये साराचा तिसरा क्रमांक लागतो. तर न्यूजपेपर रँकिंगमध्ये सारा दूसऱ्या स्थानावर आहे. व्हायरल न्यूज रँकिंगमध्ये ती पाचव्या पदावर आहे. तर साराची प्रतिस्पर्धक मानली जाणारी जान्हवी डिजिटल न्यूजमध्ये नवव्या क्रमांकांवर आहे. न्यूजपेपर रँकिंगमध्ये दहाव्या आणि व्हायरल न्यूज रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

‘या’ कंपनीने केले संशोधन

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “सारा आणि जान्हवी दोघींच्या पहिल्या सिनेमाने भरपूर लोकप्रियता मिळवली नव्हती. मात्र साराच्या बाबतीत तिच्या दूसऱ्या सिनेमाने ही कसर भरून काढली. साराची दूसरी फिल्म ‘सिम्बा’च्या प्रमोशनने साराच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. सोशल प्लेटफॉर्म, वर्तमानपत्र आणि व्हायरल न्यूज रँकिंगमध्ये साराची लोकप्रियता सिनेमाच्या रिलीजच्या सूमारास वाढलेली दिसून आलीय.” अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० पेक्षा जास्त बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -