बेटी बचाओ बेटी पढाओ

बेटी बचाओ बेटी पढाओ

i am banni

बुद्धीजीवी माणसाने विज्ञानाशी जवळीक साधून स्वत:ची प्रगती केली असली तरी आजही शहरापासून लांब राहणार्‍या समाजाला परंपरेने, पिढीजात चालत आलेल्या समाजव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे. या कार्यपद्धतीमध्ये अधिक भरकटल्या जात असतील तर त्या आहेत स्त्रिया. त्यांना शिक्षण तर दिले जातच नाही. परंतु, त्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन त्यांचे शोषणच अधिक होताना दिसते. या गोष्टीला आळा घालायचा असले तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परंतु, पुरुष जातीव्यवस्थेचे प्रस्त जास्त असल्यामुळे इच्छा असतानासुद्धा स्त्रियांना शिकता येत नाही. के.के. मक्काना याने पुढाकार घेऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा संदेश देणारा ‘आय एम बन्नी’ हा चित्रपट निर्माण केलेला आहे.

अनिल गर्ग हे या चित्रपटाचे निर्माते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने गौरव गर्ग आणि रोशनी वालिया हे या चित्रपटात नायक-नायिका म्हणून काम करीत आहेत. यानिमित्ताने त्यांचे पदार्पण होत आहे. भारतातील राज्यांचा विचार केला तर राजस्थानमध्ये हा शिक्षणाचा अभाव अधिक पहायला मिळतो. त्यामुळे दिग्दर्शकाने इथल्याच भूज आणि कच्छ विस्तारित अशा वाळवंटावर या चित्रपटाचे चित्रीकरण केलेले आहे. बन्नीचा अशिक्षित ते शिक्षित असा प्रवास प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

First Published on: January 28, 2019 5:37 AM
Exit mobile version