Gadar 2 : ‘गदर २’ ची स्टोरी ऐकून सनी देओलच्या डोळ्यात पाणी

Gadar 2 : ‘गदर २’ ची स्टोरी ऐकून सनी देओलच्या डोळ्यात पाणी

Gadar2: 'गदर २' ची स्टोरी ऐकून सनी देओलच्या डोळ्यात पाणी

‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ असे अनेक डॉयलॉग आणि गाण्यांमुळे सनी देओलचा ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपट तुफान हिट झाला होता. या चित्रपटातचा सिक्वेल लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आगामी ‘गदर २’ च्या सिक्वेलची तय्यारी सुरु झाली असून यात चित्रपटाची स्टोरी पुढे सुरु ठेवली जाणार आहे. या सिक्वेलमध्येही तारा(सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच ही कथा फिरणार आहे.

यात असे सांगितले जातेय की, जेव्हा सनी देओलला या चित्रपटाची पुढील स्टोरी ऐकवण्यात आली तेव्हा सनी देओलच्या डोळ्यात पाणी आले होते तो खूपच भावूक झाला होता. यात तब्बल दोन दशकांनतर आता ‘गदर २’ ची घोषणा झाली आहे. एका मुलाखतीत सनी देओलने म्हटले की, अनेक वर्षांपासून शर्मा जी आणि मी विचार करत होते की या चित्रपटाची कशा पुढे कशी नेता येईल? मात्र यातून चित्रपटाच्या जून्या प्रतिमेला जराही धक्का न लावता ही स्टोरी पुढे न्यायची होती. ज्यातून चित्रपट पुढेही त्याच भावनेने तयार करायचा होता. मात्र आज आम्ही त्याच स्टोरीसह तय्यार आहोत.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही सांगितले- ‘दोन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या निमित्ताने आमच्या चित्रपटाचे लेखक शक्तीमान आमच्याकडे आले आणि म्हणाले की, माझ्याकडे ‘गदर’ चित्रपटाची एक आयडिया आहे. मला स्टोरी आवडली आहे. जेव्हा ही कथा सनी साहेबांना सांगितली गेली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. मग मी विचार केला, की जर त्यांना स्टोरी आवडलीच आहे तर ही त्यांच्या टाइपची स्टोरी आहे. ही स्टोरी अधिकच जबरदस्त होईल.

दिग्दर्शक अनिल शर्माच या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करणार आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा आज म्हणजेच १५ ऑक्टोबरला झाली आहे. यात २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चित्रपटाच्या घोषणेच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या.

अभिनेत्री अमीषा पटेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात तिने ‘गदर 2’ चित्रपटाच्या घोषणेबद्दल सांगितले आहे. यात लिहिले की – ‘द कथा कंटीन्यू’. आणि मोठ्या अक्षरात ‘2’ देखील लिहिले आहे. तसेच २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर सनी देओलने देखील हीच पोस्ट शेअर केली आहे. गदर चित्रपटाच्या सिक्वेलची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. त्यामुळे गदर च्या सिक्वेलनिमित्ताने सनी देओलचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत.


‘गरबे की रात’ गाण्यावरील वादातून राहुल वैद्यला जीवे मारण्याची धमकी


First Published on: October 15, 2021 4:50 PM
Exit mobile version