घरमनोरंजन'गरबे की रात' गाण्यावरील वादातून राहुल वैद्यला जीवे मारण्याची धमकी

‘गरबे की रात’ गाण्यावरील वादातून राहुल वैद्यला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्य याचे ‘गरबे की रात’ हे गाणे सध्या खूप चर्चेत आहे. राहुलने नुकतेच नवरात्रीच्या निमित्ताने हे गाणे रिलीज केले होते. हे गाणं सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतयं. पण या गाण्यामुळे राहुल वैद्य अडचणीत सापडला आहे. या गाण्यावरून आता वाद सुरु झाले असून राहुल वैद्यला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

- Advertisement -

या गाण्यात गुजरातमध्ये पुजल्या जाणाऱ्या श्री मोगल माँ चा उल्लेख करण्यात आला आहे. जो अनेक लोकांना आवडला नाही. ‘मोगल माँ’ च्या भक्तांनी गाण्यात तिच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेतला आहे. लोकांनी गायकाला मारण्याची धमकी दिली आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर राहुलला सतत गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे धमकीचे मेसेज येत आहेत.

- Advertisement -

राहुल वैद्य याच्या प्रवक्त्याने या धमकीच्या मेसेज आणि बातम्यांना दुजोरा दिला आहे. त्याच्या प्रवक्ते सांगितले की, ‘होय हे खरे आहे की, काल रात्रीपासून धमकीचे मेसेज आणि कॉलची संख्या वाढली आहे. या मेसेजमध्ये लोक राहुल वैद्यला मारहाण करण्याबरोबरचं त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याविषयी बोलत आहेत.

त्याने पुढे म्हटले की, आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही देवीचा आदराने उल्लेख केला आहे, आमचा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. परंतु काही एका विशिष्ट वर्गाला गाणं आवडले नाही हे आम्ही ओखळून त्यांचा आदर करतो. तसेच यात सुधारणा करण्यासाठी आमच्या सर्व स्तरावर काम करत आहोत. परंतुआम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की, हे गाणे रिलीज झाल्यामुळे आम्हाला काही दिवस द्यावेत. कारण यात सुधारणा करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्या सर्वांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. आम्ही याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत.


सिंघू बॉर्डवर तरुणाची निर्घृण हत्या, बॅरिकेट्सला बांधून मुंडक धडापासून केल वेगळं


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -