‘रामायण’ला टक्कर देण्यासाठी ‘या’ मालिकेची २३ वर्षांनी पुन्हा होणार एन्ट्री!

‘रामायण’ला टक्कर देण्यासाठी ‘या’ मालिकेची २३ वर्षांनी पुन्हा होणार एन्ट्री!

लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे छोट्या पडद्यावर पुनरागम होताना दिसतेय. सर्व गाजलेल्या मालिका एकामागून एक परत येत आहेत. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, विष्णू पुराण, देवांचे देव महादेव आणि श्री गणेश या मालिाकांनंतर दूरदर्शनवर “ओम नमः शिवाय” ही प्रसिद्ध मालिका २३ वर्षांनी कलर्स वाहिनीवर परत येणार आहे.

कलर्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओम नमः शिवाय’ चे टीजर रिलीज केले आहे. ‘ओम नमः शिवाय’ ही मालिका भगवान शिवच्या गौरवमय आणि चिरंतन जीवनाचा उत्सव साकारणारी एक महाकथा आहे. १९९७ मध्ये धीरज कुमार निर्मित ‘ओम नमः शिवाय’ या मालिकेत अध्यात्म, देवत्व आणि शक्ती यांचे वर्णन केले आहे.

यासह भगवान शिव विश्वाच्या नियतीला नियंत्रित करत असून या मालिकेत भक्तिपूर्ण कृत्ये, आसुरी लढाया, प्रसिद्ध शिव-तांडव आणि आपल्या भूतकाळाच्या इतर महत्त्वाच्या धार्मिक घटनांचे चित्रण केल्याने आकर्षक मार्गाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या मालिकेत समर जय सिंह शिवच्या भूमिकेत यशोधान राणा हे कामाच्या भूमिकेत, गायत्री शास्त्री ही अभिनेत्री पार्वतीच्या भूमिकेत, मनजीत कुल्लर ही सती, संदीप मेहता हा नारद, अमित पचौरी हे विष्णूच्या भूमिकेत तर सुनील नागर याने ब्रह्माची भूमिका साकारली आहे.

या मालिकाही येणार पुन्हा…

देशभरात लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांचा मालिका पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. गेल्या काही महिन्यांत, दर्शकांना समृद्ध पौराणिक कथांमध्ये सामर्थ्य, प्रोत्साहन आणि एकांत सापडला आहे. या पौराणिक मालिकांसह, लोकप्रिय मागणीनुसार, कलर्स वाहिनीवरना आना इस देस लाडो आणि उतरन या दोन लोकप्रिय मालिका परत येणार आहे.


Video: अमेरिकेत रोनित रॉयचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या नेमकं यामागचं कारण
First Published on: June 2, 2020 10:32 PM
Exit mobile version