‘ब्रह्मास्त्र’मध्ये वानर अस्त्रच्या भूमिकेत झळकणार शाहरूख खान

‘ब्रह्मास्त्र’मध्ये वानर अस्त्रच्या भूमिकेत झळकणार शाहरूख खान

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्रा आलिया भट्टचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. परंतु आमीर खान आणि अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन बॉक्स ऑफिसवर पुरेपुर फ्लॉप ठरला. या चित्रपटांवर सोशल मीडियावरून बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे या चित्रपटांवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता आलिया आणि रणबीरच्या या चित्रपटावर देखील सोशल मीडियावर काहीजण बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्की बॉक्स ऑफिस कसा ठरेल हे पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’ मधून एकानंतर एक नवनवीन व्हिडीओ, फोटो शेअर केले जात आहेत, ज्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचत आहे. या चित्रपटातील नुकतीच एक क्लिप आलिया भट्ट आणि करण जौहरने शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची एक झलक पाहायला मिळत आहे.

9 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित
अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : गुरू उठा ले अस्त्र जब । करे पाप का नाश…..’ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक शेअर

First Published on: September 2, 2022 11:11 AM
Exit mobile version