Shah Rukh Khan ची मुलगी सुहाना ‘या’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार

Shah Rukh Khan ची मुलगी सुहाना ‘या’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार

Shah Rukh Khan ची मुलगी सुहाना 'या' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कारण सुहानाला सिनेमा दिग्दर्शक झोया अख्तरच्या ऑफीसच्या बाहेर पाहिले होते. त्यामुळे झोयाच्या पुढील सिनेमात ती दिसणार असल्याचा अंदाज बांधला जात असून, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यावेळेस सुहाना टॅंक टॉप आणि कार्गो पॅंटमध्ये दिसली. त्यामुळे सुहाना खानच्या बॉलीवूडमधील पदार्पणासाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

एका वृत्तानुसार, झोयाचा पुढचा चित्रपट आर्ची कॉमिक्सचे रूपांतर असेल. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचाही या चित्रपटासाठी विचार केला जात आहे. कदाचित या स्टार किड्ससाठी हे लॉन्चपॅड असू शकते, असे मानले जात आहे. सुहाना खान तिच्या अभ्यासासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. ती अनेकदा तिचे न्यूयॉर्कमधील फोटो शेअर करत असते. तिने याआधीच ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सुहाना खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत.

सुहानाचे लाईफस्टाईलचे बरेचजण चाहते आहेत. सुहाना खानच्या वॉर्डरॉबमध्ये बऱ्याच प्रमाणात लक्झरी ब्रॅंडचे कपडे आहेत.काही दिवसांपूर्वी सुहाना खान कॅमेरात कैद झाली. त्यामुळे ती झोया अख्तरच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.


हे ही वाचा – CISCE Term 1 Result 2021: ICSE आणि ISC च्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा रिझल्ट


 

First Published on: February 7, 2022 1:03 PM
Exit mobile version