‘Dunki’ चित्रपटातील शाहरुख खानचा First Look आला समोर

‘Dunki’ चित्रपटातील शाहरुख खानचा First Look आला समोर

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील वर्षी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. अशातच आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यात शाहरुख हिरवा टी-शर्ट, फंकी घड्याळ आणि खांद्यावर लटकलेल्या बॅगेसोबत दिसत आहे. यात शाहरुख सोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील दिसत आहेत. सध्या शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपटातील फर्स्ट लूक पाहून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

‘डंकी’ मधील शाहरुखचा फर्स्ट लूक रिलीज

‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख

‘पठाण’, ‘डंकी’नंतर शाहरुख जवान चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. जवानमध्ये साऊथ अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसेल. जवान चित्रपट देखील 2023 मध्येच प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

अमिताभ बच्चननंतर हा अभिनेता झाला जखमी; चित्रिकरणादरम्यान अपघात

First Published on: April 13, 2023 9:37 AM
Exit mobile version