आगामी सिरीज ‘फर्जी’मधील शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ प्रदर्शित

आगामी सिरीज ‘फर्जी’मधील शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ प्रदर्शित

अमेझॉन प्राइम व्हिडिओची आगामी क्राईम थ्रिलर सिरीज ‘फर्जी’मधील ‘आर्टिस्ट’ सनीची झलक पाहण्यासाठी दर्शकांची उत्सुकता वाढत असतानाच, प्राइम व्हिडिओने आता अखेरीस शाहिद कपूरचा कॅरेक्टर व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी उर्फ ​​आर्टिस्ट आपल्या क्रिएटिव स्किल्सचा वापर बनावट नोटा बनवत उत्तम जीवन जगण्यासाठी करताना दिसत आहे. तसेच, व्हिडिओमध्ये राशी खन्नाची देखील झलक पाहायला मिळते, जी नोंद करते की, आर्टिस्टचे काम प्रशंसनीय आहे आणि नकली नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याला थांबवले पाहिजे.

‘फर्जी’ही आठ भागांची क्राईम थ्रिलर सिरीज आहे ज्यामध्ये राज आणि डीके यांच्या सिग्नेचर ह्युमर पाहायला मिळणार असून, एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या नजरेतून एलीट क्लासची बाजू घेणाऱ्या सिस्टमला फेल करण्याचा प्रयत्न दाखवला आहे. अशातच, ‘फर्जी’ही सिरीज 10 फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारत आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.

 


हेही वाचा :

कोण आहे शाहरुख खान? ‘पठाण’च्या प्रश्नावर आसामच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

First Published on: January 22, 2023 11:27 AM
Exit mobile version