करिना नंतर शाहीद कपूरच्या घरी देखील Good News; मीराने शेअर केला फोटो!

करिना नंतर शाहीद कपूरच्या घरी देखील Good News; मीराने शेअर केला फोटो!

मीरा कपूर

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा कपूर. खरतर मीरा ही सामान्य घरातील मुलगी आहे. पण तीच्या स्टाईल स्टेमेंटमुळे ती नेहमी चर्चेत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणेच मीराचेही फोटोची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. नुकताच मीराने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण या फोटोत मीरा बेबी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्यामुळे मीरा पुन्हा प्रेग्नट आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मीराने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेल्या फोटोत तिचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोत ती सिंम्पल ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूप साधी पण नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत आहे. या फोटोत मीराने डोळे मिटले आहेत, पण ती कॅमेराकडून तोंड करून किस करत आहे. आता हा फोटो बघून सगळ्यांना प्रश्न पडला आहे की मीरा पुन्हा प्रेग्नंट आहे का? मात्र तस नाही कारण मीराचा हा जूना फोटो आहे. जेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नंट होती. जेव्हा चार वर्षापूर्वी मीशाचा जन्म झाला होता. तेव्हाचा हा फोटो आहे.

हा फोटो शेअर करताना मीराने लिहीलं आहे की, प्रसूतीच्या एक दिवस आगोदर #4yearstoday. मला हे समजू शकते की पोट वाढत होते पण नाकाचं काय झालं होतं ते का वाढत होतं?

मीराचा हा फोटो बघितल्यावर चाहत्यांचा आधी गोंधळ उडाला पण नंतर कॅप्शन वाचल्यानंतर नेटकऱ्यांना समजले की हा फोटो जूना आहे.


हे ही वाचा – पुण्यात दोन जणांवर ऑक्सफर्ड लसीची चाचणी!


First Published on: August 26, 2020 6:22 PM
Exit mobile version